बुधवारी ७० बळींसह २८६५ बाधित

0
64

>> एकूण मृत्यू १८७४, सध्याचे रुग्ण ३२,७९१

राज्यात गेल्या चोवीस तासांत उच्चांकी ७० रुग्णांचा बळी गेला असून नव्या २८६५ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या १८७४ एवढी झाली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३२ हजार ७९१ झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४१.४० टक्के एवढे आहे. चोवीस तासांत इस्पितळामधून २१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

चोवीस तासांत ७० मृत्यू
राज्यात मे महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. मंगळवारी ७५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर, मागील चोवीस तासांत आणखी ७० कोरोना रुग्णांच्या बळींची नोंद झाली.

नवे २८६५ रुग्ण
राज्यात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येण्याचे प्रमाण कायम आहे. गेल्या चोवीस तासांत नवे २८६५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या ६९२० स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आला. राज्यात कोविड स्वॅबबाधित होण्याचे प्रमाण ४१.४० टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख २७ हजार ६३९ एवढी झाली आहे.

मडगाव, पणजीत सर्वाधिक रुग्ण
मडगावबरोबर राजधानी पणजी, कांदोळी, फोंडा, पर्वरी, म्हापसा या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मडगावातील रुग्णसंख्या २८४२ एवढी झाली आहे. पणजीतील रूग्णसंख्या १८७० एवढी झाली आहे. कांदोळी भागातील रूग्णसंख्या १७३४, पर्वरी १६६८ रुग्ण, म्हापसा येथे १५७९ रुग्ण, फोंडा १७२६ रुग्ण, कुठ्ठाळी १३३९ रुग्ण, साखळी १४०५ रुग्ण, पेडणे १२९५, शिवोली ११२७ रुग्ण, चिंबल १२५१ रुग्ण, वास्को येथे १०२२ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागांतही रूग्णसंख्या जास्त आहे.

२४ तासांत ३३४ इस्पितळात
गेल्या चोवीस तासांत नव्या ३३४ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून इस्पितळात दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आता तीनशेच्यावर रुग्णांना दाखल केले जात आहेत.

२८४० जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाबाधित आणखी २८४० रुग्ण काल बरे झाले आहेत. राज्यात कोरोना बाधेतून बर्‍या होणार्‍या रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ९२ हजार ९७४ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.८४ टक्के एवढे आहे.

गोमेकॉत बुधवारी
४० जणांचा बळी
चोवीस तासांत जीएमसीमध्ये ४० रुग्णांचा बळी गेला आहे. तर, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात २३ रुग्णांचा बळी गेला. उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात ३, हॉस्पिसिओ आणि वाळपई आरोग्य केंद्रात प्रत्येकी २ जणांचा बळी गेला. ७० बळी गेलेल्यांमध्ये ८ रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता.