Home बातम्या महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवणार ः टोपे

महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवणार ः टोपे

0

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती काल महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत सर्वच मंत्र्यांनी आग्रह धरला. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील असे मंत्री टोपे यांनी स्पष्ट केले.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यात लॉकडाऊनमुळे बर्‍याच प्रमाण यश आले आहे. मात्र, अजूनही दैनंदिन रुग्णसंख्या मोठी असल्याने लॉकडाऊन १५ मेनंतरही वाढवण्यात यावा असे मंत्रिमंडळ बैठकीत बहुतेक मंत्र्यांनी सांगितले. त्याबाबत मुख्यमंत्रीही सकारात्मक असून यावर अंतिम निर्णय तेच घेतील, असे मंत्री टोपे म्हणाले.