सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड कोरोनाबाधित

0
67

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांना कोरोनाची बाधा झाली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच त्यांच्या एका कर्मचार्‍यालादेखील करोनाची लागण झाली आहे. न्या. चंद्रचूड यांची तब्येत बरी असली तरी त्यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर कोणतीही सुनावणी होणार नाही आहे.

देशातील कोविड -१९च्या संकटासंदर्भातील सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाद्वारे सुरू आहे. आज गुरूवारी या प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र त्या आधीच न्यायमूर्ती चंद्रचूड कोरोनाबाधित झाल्यामुळे न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.