Home बातम्या पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीस अटक

पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीस अटक

0

डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी किशोर व त्याची पत्नी कल्पना यांच्यात वादावादी झाली होती. त्यानंतर कल्पना दागिने घेऊन ती शिरगावला आपल्या माहेरी आली.

काल दुपारी सव्वादोनच्या सुमारास पुन्हा कल्पना सुर्लाला आली. मेहुणा व मेहुणी व इतर तिघे त्यावेळी सोबत होते. त्यावेळी कल्पनाने घरातील सामान जवळ केले त्यावेळी नवर्‍याने विचारणा केली असता किशोरला त्यांनी मारहाण केली. त्यावेळी किशोरची आई सावित्री व चुलती प्रेमा आमोणकर यांनी जाब विचारला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सावित्री जखमी झाली असून तिच्यावर म्हापसा आझिलो इस्पितळात उपचार सुरू आहेत.

यावेळी किशोरलाही मारहाण झाल्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेने साखळी येथे उपचारासाठी नेण्यात आले व उपचार करून घरी आणण्यात आले.

रात्री किशोर नॉयलॉनच्या दोरीचा गळ्याला फास लावलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला. त्यावेळी मागून खोली बंद होती. डिचोली पोलिसांना खबर मिळताच निरीक्षक सुरेश नाईक व इतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून किशोरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीला पाठवला असून शवचिकित्सा अहवालात अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.