वागातोर किनार्‍यावर बुडणार्‍या पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचवले

0
279

वागातोर येथे समुद्र किनार्‍यावर बुडणार्‍या चार पर्यटकांना दृष्टीच्या जीवरक्षकांनी काल वाचविले आहेत.
मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हरयाणा, दिल्ली येथील चार पर्यटक समुद्रात आंघोळ करण्यासाठी उतरले होते. यावेळी जीवरक्षकांनी पर्यटकांना धोक्याची सूचना देऊन समुद्रातून बाहेर येण्याची सूचना केली. परंतु, चार पर्यटकांनी जीवरक्षकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून समुद्रात आंघोळ करणे सुरूच ठेवले.

काही वेळानंतर समुद्रात एकटा पर्यटक बुडू लागला. त्याने मदतीसाठी आरडाओरड केली. काही क्षणात समुद्रात उतरलेले इतर ३ पर्यटकही पाण्याच्या प्रवाहात सापडून बुडू लागले. दृष्टीच्या जीवरक्षकांनी समुद्रात धाव घेऊन चारही जणांना बाहेर काढले. समुद्रात बुडालेल्या एका पर्यटकाला श्‍वास घेण्याचा त्रास होऊ लागल्याने रुग्णवाहिका बोलावून त्याला इस्पितळात हालविण्यात आले आहे.