चीनने करार मोडल्यानेच संघर्ष ः राजनाथ सिंह

0
270

भारत आणि चीनमध्ये नियंत्रण रेषेचा १९९३-१९९६ मध्ये झालेल्या करारात स्पष्ट रुपात स्वीकार करण्यात आला आहे. परंतु, चीनकडून हा करार मोडण्यात आला त्यामुळेच सीमेवर भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल सांगितले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात लोकसभेत लडाखच्या मुद्द्यावरून भारत-चीन सीमावादावर अधिकृतपणे भारताची भूमिका मांडली. लडाखला जाऊन आपल्या शूरवीरांसोबत काही वेळ व्यतीत केला. मलाही त्यांचे साहस, शौर्य आणि पराक्रम जाणवल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. २९-३० ऑगस्ट रोजी पँगॉंग सरोवरच्या दक्षिण भागात स्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनने केला मात्र हा प्रयत्न भारतीय सेनेने हाणून पाडला. मात्र यातून द्विपक्षीय संबंधाचा चीनकडून अनादर झाल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले. मेमध्ये चीनने कोंकला, गोदरा आणि पॅन्गॉंग सरोकवराजवळ काही कारवाया करण्याचा प्रयत्न केला मात्र तिथेही आपल्या जवानांनी चीनला सडेतोड उत्तर दिल्याचे सिंह म्हणाले.