अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अखेर काल मंगळवारी मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) ही कारवाई केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच अमली पदार्थ सेवन आणि तस्करीचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. त्या दिशेने तपास सुरू केल्यानंतर रिया चक्रवर्तीचे नाव उघड झाले. त्यामुळे तिची गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू होती व काल मंगळवारी अखरे तिला अटक करण्यात आली. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते.
यापूर्वी एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर आता एनसीबीकडून रियाला अठक करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक करण्यात आलेला आरोपी दीपेश सावंत याने दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.