पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याकडून गोळीबार

0
279

मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा चिनी सैनिकांनी लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. सोमवारी संध्याकाळी घुसखोरी करत असताना भारतीय जवानांनी चिनी सैन्याला रोखल्यानंतर चिनी सैन्याने हवेत गोळीबार केला होता. त्यानंतर पुन्हा मंगळवारी चिनी सैनिकांनी भारतीय चौकी धारदार शस्त्रे घेऊन घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी तो प्रयत्न हाणून पाडला. यानंतर भारतीय जवानांनी हवेत गोळ्या झाडत त्यांना तेथून हुसकावून लावले. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने हवेत गोळीबार करत भारतीय चौक्यांजवळ येण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी त्यांना माघारी पाठवले आहे. या संदर्भात चीनने भारतीय लष्करावर केलेला घुसखोरीचा आरोप भारतीय लष्कराने फेटाळला आहे.

अरुणाचल प्रदेशचे बेपत्ता
तरुण चीनमध्ये सापडले

अरुणालचल प्रदेशमधून बेपत्ता झालेले पाच तरूण चीनमध्ये असल्याची माहिती केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांनी ट्विटद्वारे दिली आहे. चिनी ‘पीएलए’ने (पीपल्स लिबरेशन आर्मी) या वृत्तास दुजोरा दिल्याचे रिजीजू यांनी सांगितले.

‘पीएलए’ने भारतीय सेनेला हॉटलाइनवर पाठवण्यात आलेल्या संदेशाला उत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, बेपत्ता तरूण त्यांच्या भागात आढळले आहेत. आता या तरूणांना भारताकडे सोपवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. असे ट्विट किरेन रिजीजू यांनी केले आहे.