पणजी मतदारसंघाची कॉंग्रेसची उमेदवारी महापौर यतीन पारेख यांना देण्याचा कॉंग्रेसने विचार चालविला असून त्यासाठी पारेख यांना काल तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे.
यापूर्वी पणजी मतदारसंघासाठी कॉंग्रेसने सोमनाथ जुवारकर व सुरेंद्र फुर्तादो या दोन नावांचा विचार केला होता. आता अकस्मात पारेख यांना दिल्लीत बोलावून घेतल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे.
पारेख यांना ताबडतोब दिल्लीला जावे लागल्याने काल निश्चित केलेली महापालिका मंडळाची बैठक ऐनवेळी रद्द करावी लागली.