राष्ट्रवादीला आणखी २ जागा : भोसले

0
94

कॉंग्रेसला हव्या असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणखी दोन मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे.

त्यासाठी मांद्रे, शिवोली, कुठ्ठाळी व मये या चार मतदारसंघांपैकी कोणतेही दोन निवडून राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार राष्ट्रवादीने कॉंग्रेसलाच दिल्याचे प्रवक्ते ऍड. अविनाश भोसले यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर डोळा ठेवून असल्याचे कळते.