जिल्हा पंचायतीप्रमाणेच पालिका मंडळांच्या निवडणुकाही पक्षीय पातळीवर घ्याव्यात, असे आपले मत आहे. परंतु पंचायतींच्या निवडणुका पक्षीय पातळीवर घेणे अयोग्य होईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकारांना सांगितले.राज्यात मगो-भाजप युतीने परिवर्तन आणले. गेल्या ३ वर्षांच्या काळात सरकारने अनेक आश्वासनांची पूर्तता केली आहे. विकासकामे चालूच आहेत. भूसंपादन प्रक्रियेला विलंब लागतो व त्याचा विकास प्रकल्पांवर परिणाम होतो. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होतो, असे ढवळीकर यांनी एका प्रश्नावर सांगितले. जिल्हा पंचायतीच्या निवडणूक प्रचारासाठी कमी दिवस मिळाले असले तरी त्याचा विशेष परिणाम होणार नाही. जनता विकासाच्या बाजूनेच मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दि. १८ रोजी होणार्या वरील निवडणुकीत दोन्ही जिल्हा पंचायती युतीच्या ताब्यात येणार असल्याचे सांगून सरकार युतीचे असल्याने कामे करणे सोपे होईल व अस्थिरतेवरही नियंत्रण येईल, असे ढवळीकर म्हणाले.