Home बातम्या पोलीस शिपायाला  कैद्याकडून मारहाण

पोलीस शिपायाला  कैद्याकडून मारहाण

0

सडा उपकारागृहातील कैदी जयेश नाईक याने पोलीस शिपाई जगदीश फडते याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची घटना काल सकाळी घडली. सदर कैद्याला न्यायालयीन सुनावणीसाठी नेण्यात येण्यापूर्वी ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. कैदी जयेश नाईकवर खून प्रकरणी खटला सुरू असून काल सकाळी या प्रकरणी त्याला मडगावच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी असल्याने नेण्याची तयारी सुरू होती. न्यायालयात घेऊन जाण्यापूूूूर्वी पोलीस शिपाई फडते त्याची तपासणी करीत होता. सदरवेळी कैदी जयेशने आपल्याला कशाला हात लावलास असा प्रश्‍न उपस्थित करून हुज्जत घालण्यास सुरुवात करून अचानक लाथा-बुक्क्यांनी पोलीस शिपायाला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी इतर सुरक्षा जवानांनी लगेच मध्यस्थी करून दोघांना वेगळे केले. यानंतर पोलीस शिपाई जगदीशला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या हल्लाप्रकरणी कैदी जगदीशविरुद्ध भा. द. सं. ३५३ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपिल नाईक या प्रकरणी तपास करीत आहेत.