Home बातम्या कोडार नदीत विद्यार्थी बुडाला

कोडार नदीत विद्यार्थी बुडाला

0

कोडार-फोंडा येथील नदीच्या परिसरात सहलीसाठी आलेल्या १७ मुलांच्या गटातील विराज विष्णू मोपकर (१८) हा सडा-वास्को येथील विद्यार्थी कोडार नदीच्या पाण्यात बुडून मरण पावला. सदर मुलगा यंदा ११ वीच्या वर्गात शिकत होता. वास्को येथून १५ ते २०, २५ वयोगटातील १७ मुलांचा गट सहलीसाठी आला होता. सर्व मुले पोहण्यासाठी व आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरली असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मरण पावला. फोंडा अग्निशामक दल, फोंडा पोलीस व नागरिकांनी शोधाशोध करून प्रेत पाण्याबाहेर काढले. उपनिरीक्षक जी. ए. मळीक यांनी पंचनामा केला.