Home बातम्या नथुरमल खाण कंपनीचे कामगार आंदोलनाच्या तयारीत

नथुरमल खाण कंपनीचे कामगार आंदोलनाच्या तयारीत

0

नथुरमल खाण कंपनीने आपल्या १२० कामगारांना सेवेतून कमी केले आहेत. त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याच्या मागणीसाठी येत्या शुक्रवारी राजधानीत धरणे धरणार असल्याची माहिती कामगार नेते अजितसिंह राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. खाण बंदीपूर्वीच वरील कंपनीने कामगारांना बेरोजगार केले होते. कामगारांना कमी करतेवेळी योग्य मोबदला देण्यात आलेला नाही, असे राणे यांनी सांगितले.