केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल किमतीच्या दरवाढीविरोधात काल द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने (डीएमके) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तमिळनाडूत जोरदार निदर्शने केली. इंधनाच्या किमती स्थिर राहाव्या यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करायला हवेत. मात्र, सरकार पुन्हा पुन्हा दरवाढ करून लोकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप डीएमकेने केला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ही दरवाढ पूर्णपणे अमान्य असल्याचे म्हटले आहे. या दरवाढीचा संघटित निषेध करण्याचे आवाहन या पक्षाने केले आहे.