प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात उतरवण्यात येणार असून उद्या त्यांच्याकडे कॉंग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे प्रियांका गांधी यांना राजकारणात उतरवण्याची मागणी देशभरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. सदर मागणीनुसार पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ही नियुक्ती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, राहुल गांधी यांच्याकडेही लवकरच पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.