देशभरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असल्याने केंद्र सरकारने या रोगाला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून तो रोखण्यासाठी युद्ध पातळीवर पावले उचलण्याची गरज असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी म्हटले आहे. कटक येथे डॉक्टरांशी या रोगाविषयी ऊहापोह केल्यानंतर श्री. तोगडिया म्हणाले की, आतापर्यंत या रोगामुळे एक हजाराहून नागरिकांचा मृत्यू झाला असल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना स्वाइन फ्लूला रोखण्यासाठी सुविधा पुरवल्या पाहिजेत.