Home बातम्या हॉटेलांवरील कारवाईच्या स्थगितीस नकार

हॉटेलांवरील कारवाईच्या स्थगितीस नकार

0

सांडपाण्याच्या प्रदूषणाच्या कारणावरून उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकार्‍यांनी कोलवा येथील २० हॉटेलाना टाळे ठोकण्याचे आदेश जारी केला होता. त्यातील १५ हॉटेल मालकांनी जो आदेश रद्द ठरविण्याची मागणी करणारा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला होता तो अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विजया पळ यांनी फेटाळून लावला.

वीसपैकी ग्रासियाना कॉटेजीस यांच्यावरील कारवाईस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हॉटेलानी सांडपाणी गटारातून सोडून ते समुद्रात सोडले जात होते. त्यावर प्रयत्न करूनही मालकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याने बिगर सरकारी संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.