Home बातम्या ‘हायकमांड’च्या आदेशानंतर उत्तराखंड मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

‘हायकमांड’च्या आदेशानंतर उत्तराखंड मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

0
उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी काल पदाचा राजीनामा दिला. ‘हायकमांड’नी आपणास दिलेल्या आदेशानुसार राजीनामा दिल्याचे बहुगुणा यांनी नंतर बोलताना सांगितले.

दरम्यान, बहुगुणा यांच्या जागी केंद्रीय मंत्री हरीष रावत यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. आज होणार्‍या कॉंग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत नव्या नेत्याची निवड केली जाईल.