Home बातम्या सरदार पटेलांच्या एकता स्मारकासाठी उपक्रम

सरदार पटेलांच्या एकता स्मारकासाठी उपक्रम

0

 राज्यातील पंचायतीमध्ये आजपासून पंचांच्या स्वाक्षर्‍या

गुजरात राज्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ एकतेचे शिल्प उभारण्यात येणार असल्याने आज दि. १ व उद्या दि. २ व ३ रोजी राज्यातील प्रत्येक पंचायतींमध्ये सुराज याचिकेवर पंचांच्या स्वाक्षर्‍या करून त्या सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे पंचायतमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. वरील प्रकल्पाखाली देशातील ६ लाख पंचायतींमध्ये कार्यक्रम होईल. कष्ट करण्यासाठी शेतकर्‍यांना लागणार्‍या हत्त्यारांचे तुकडे तसेच शेतातील माती मिळून प्रत्येक पंचायत दोन किलो वजनाचे हे साहित्य गुजराथला पाठवून देण्याची व्यवस्था केली जाईल. गुजराथमध्ये पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. तेथे संग्रहालय असेल. पर्यटन स्थळ म्हणूनही तो परिसर विकसित होईल. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकात्मता प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पंचायत मंडळांचे फोटोही संग्रहालयात लावण्यात येणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.

येत्या दि. ४ रोजी म्हापसा येथील बोडगेश्‍वर मैदानावर तर ५ रोजी केपे येथे खास कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेस या कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष उद्योगमंत्री महादेव नाईक उपस्थित होते.