Home बातम्या भुल्लेरच्या फाशीस स्थगिती

भुल्लेरच्या फाशीस स्थगिती

0
खलिस्तानवादी दहशतवादी देवींदर पाल सिंग भुल्लेर यांच्या फाशीस काल सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. याआधी कोर्टाने, फाशी रद्द करून जन्मठेप देण्याची भुल्लेरची याचिका फेटाळली होती. काल फाशीस स्थगिती देताना आपल्या निवाड्याचा फेरआढावा घेण्याचे कोर्टाने मान्य केले. १९९३ साली भुल्लेरने दिल्लीत बॉम्बस्फोट घडवून आणले होते.

यात एका युवा कॉंग्रेस नेत्यासमवेत नऊ जण ठार झाले होते तर २५ जण जखमी झाले होते. याप्रकरणात खालच्या कोर्टाने दिलेल्या फाशीस २००२ साली सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली होती. दरम्यान, दयायाचिकेवर कार्यवाहीस विलंब झाल्यास फाशी रद्द होऊ शकते या सर्वोच्च न्यायालयाच्या २१ जानेवारीच्या निवाड्यानंतर भुल्लेरच्या पत्नीने फाशी रद्द करण्याची याचिका नव्याने सादर केली आहे.