– सुजाता घाडी
फ्लोटिंग कँडल या गृहसजावटीतील नव्या प्रकारानेही भारतीय बाजारपेठांमध्ये चांगले बस्तान बसवले आहे. सणांना वा घरात मंगलकार्य असताना, हल्ली या फ्लोटिंग कँडलच्या मदतीने आकर्षक सजावट करता येते आणि घरातही नावीन्य जाणवते. एका पसरट भांड्यात विशेषत: ‘अँटिक टेक्श्चर’ असलेल्या आपल्या पारंपरिक घंगाळ्यात पाणी आणि त्यावर ङ्गुलांच्या पाकळ्या पसरून त्यात या पेटलेल्या कँडल सोडल्यास त्या खोलीला एक वेगळाच छान लुक येतो.
………..
सणासुदीला घर सुंदर दिसावे म्हणून सगळेजण प्रयत्न करतात. घराच्या स्वच्छतेपासून ते घर सजवण्यापर्यंतच्या तयारीमध्ये घरातल्या सदस्यांचे हात गुंतलेले असतात. गडबड-गोंधळ, सुग्रास जेवणाचा घमघमाट, सुगंधित वातावरण, ङ्गुलांची आरास हे सणासुदीच्या दिवसात बहुतेक घरांत दिसणारे हमखास दृश्य! या दिवसांत घरामध्ये पाहुणे मंडळी आणि मित्रपरिवाराची लगबग सुरू असते. अशा वेळी घरात आलेल्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेणारी बाब ठरते, ती घरातली सजावट. पण दरवेळी नवीन काय करायचं, हा प्रश्न पडतोच.
घरात शिरताना प्रथम नजरेत भरतो, तो दरवाजा. आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेऊन घराचा मुख्य दरवाजा सजवावा. अलीकडच्या काळात आधुनिक काचेच्या दरवाजापासून गॉथिक स्टाइलपर्यंत अनेक पर्याय दरवाजा सजवण्यासाठी उपलब्ध आहेत. डोअर डेकोरचे आणि विंडो डेकोरचे काही पर्याय जाणून घेणे आवश्यक आहे. यामुळे घराला एक वेगळा लुक येईल.
घराच्या दरवाजातून आत शिरताना घराबद्दल एक विशिष्ट प्रतिमा आपोआप तयार होते. उदाहरणच द्यायचे झाले तर फ्लॅटचा दरवाजा हा साधारणपणे सहा, साडेसहा ङ्गुट उंचीचा आणि सिंगल असतो. तोच बंगल्याचा दरवाजा हा जास्त रुंद आणि उंच असतो. एखाद्या वाड्याचा जुन्या पद्धतीने बांधलेला घराचा दरवाजा हा जाड, पितळी कड्यांनी सजवलेला असा असतो. थोडक्यात, दरवाजावरून घरातील अंतर्गत रचनेबद्दल प्राथमिक कल्पना नक्कीच येते.
अलीकडच्या काळात दरवाजाची व्याख्या बरीच बदलली आहे. केवळ घरात येण्याजाण्याचा हा मार्ग नसून त्याची प्रतिमा बनवणारा प्रमुख घटक असतो. उत्तम प्रकारे बनवलेला दरवाजा आपल्या घराची वेगळीच छाप पाडणारा ठरतो, यात शंका नाही. दरवाजाचा अगदी प्राथमिक उपयोग म्हणजे संरक्षण होय. घरात येण्याजाण्याचा हा प्रमुख मार्ग तेवढाच सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यासाठी कड्या, कोयंडे, लॅच अतिशय चांगल्या दर्जाचे आणि दणकट असावे. मूळ दरवाजा कोणकोणत्या प्रकारे बनवता येईल ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. प्रवेश दरवाजा म्हणजे घराचा मुख्य दरवाजा. हा दरवाजा सर्वात आकर्षक असावा. आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेऊन प्रमुख दरवाजा सजवावा किंवा बनवावा. दरवाजातून आतल्या बाजूने बाहेरचे दिसावे किंवा नाही या गरजेनुसार तो बनवावा.
घराची रंगसंगती सणासुदीला आकर्षक असावी असे प्रत्येकाला वाटते. या दिवसांत निसर्गत:च वातावरणात प्रसन्नता असते. सणानिमित्त वा कोणत्याही शुभकार्यानिमित्त घराला रंग देताना, गडद रंगांमधील छटांची निवड करावी. त्यातही लाल, पिवळा, केशरी या रंगांतील छटा अधिक खुलून दिसतात. हल्लीच्या ‘ट्रेंड’नुसार घरातल्या भिंतींना ‘कलर टेक्श्चर’ देण्याची फॅशन चांगलीच प्रचलित आहे. थोडी खर्चीक आहे; पण हा प्रकार दिसायला ङ्गारच छान दिसतो. विशेषत: हॉलमधल्या एखाद्या भिंतीला हे टेक्श्चर खूपच उठून दिसते वा आवडत असल्यास बेडरूममध्येही तुम्ही हा प्रयोग करू शकता. यातही बरेच प्रकार आहेत. तुम्हांला आवडेल ती डिझाइन तुम्ही निवडू शकता. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, टेक्श्चरमध्ये एक क्रशचा (सुरकुतलेला) इङ्गेक्ट येतो. तो दिसायला कितीही आकर्षक असला, तरी जर तुमच्या घरात वारंवार धूळ येत असेल, तर हे न वापरलेलच बरं. कारण यात धूळ साचून राहते. विविध प्राण्यांच्या, ङ्गुलांच्या वा आणखी काही डिझाइन्सने तुम्ही घरातल्या भिंती सजवू शकता.
घरात पाहुणे आल्यावर तुम्ही आधी त्यांना बसायला सांगता. त्यामुळे साहजिकच घरातल्या रंगसंगतीनंतर त्यांचे लक्ष बैठकीच्या मांडणीकडे जाते. आपली बैठकीची मांडणी साधरणत: मध्यभागी कुशन आणि बाजूला लोड अशी असते. त्यातही हल्ली बर्याच जणांकडे पाश्चिमात्य बैठक असते; पण जर तुम्ही घराचा लुक बदलायचा विचार करत असाल, तर भारतीय पद्धतीच्या बैठकीचा यात जरूर विचार करावा. बैठकीच्या कुशनच्या सजावटीमध्ये तुमच्याकडील वापरात नसलेल्या काठापदराच्या साडीचेही कुशन कव्हर बनवू शकता वा एखाद्या साध्या कुशन कव्हरवर नक्षीकाम केलेल्या लेसही तुम्ही लावू शकता. गडद रंगाच्या कापडावर त्याच्या विरुद्ध रंगसंगतीच्या नक्षीदार केलेल्या लेस लावल्यास त्या जास्त उठून दिसतात. पारंपरिक भारतीय रंगसंगतीवर गडद रंगांचा जास्त प्रभाव आढळतो. यानुसार तुम्हीही भारतीय बैठकीत असे रंग नक्कीच वापरू शकता. तुमची बैठक पाश्चिमात्य पद्धतीकडे वळणारी असेल तर बाजारात वेगवेगळे प्रिटेंड डिझाइन्स केलेले कुशन कव्हर्सही उपलब्ध आहेत. यात समुद्रकिनार्याच्या, ङ्गुलांच्या किंवा वारली चित्रकलेच्या कितीतरी डिझाइन्स उपलब्ध आहेत. एखाद्या एकरंगी, प्लेन बेडशीटवर हे प्रिंटेड कुशन किंवा लोड एकदम सुरेख दिसतात. तुमच्या घराच्या रंगसंगतीला साजेशी अशी कव्हर्सची रंगसंगती असावी.
क्वचितच कधीतरी विशेषत: शुभप्रसंगी आपण ताज्या खर्या ङ्गुलांनी घर सजवतो. कारण ही ङ्गुले ङ्गार कमी काळ टिकतात. त्यातली परदेशातून येणारी काही ङ्गुले मनमोहक असली, तरी त्यांनी दरवेळी घर सजवणे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसते. म्हणूनच अशा वेळी सजावटीसाठी कृत्रिम ङ्गुलांचा पर्याय अधिक सोयीस्कर वाटतो. पूर्वी कृत्रिम ङ्गुले म्हटली की, भडक रंगांची ङ्गुले समोर यायची. भडक रंग वापरल्यामुळे त्यांच्यातला खोटेपणा उघड व्हायचा, म्हणून शक्यतो याचा सजावटीसाठी वापर करणे टाळले जायचे. पण आता कृत्रिम ङ्गुलांचे एवढे प्रकार बाजारात आले आहेत, की बघताक्षणीच ही ङ्गुले नजरेत भरतात आणि ती खोटी आहेत यावर तर विश्वासच बसत नाही. त्यामुळे घराच्या सजावटीमध्ये या पर्यायाचा विचार तुम्ही करू शकता. ही ङ्गुले प्लॅस्टिक, कापड, स्टॉकिन्स व ड्युप्लेक्स पेपरमध्येही उपलब्ध आहेत. ही ङ्गुले निवडताना मात्र काही गोष्टीचा विचार करावा. तुमच्या भिंतींच्या रंगसंगतीपेक्षा या ङ्गुलांचे रंग उठावदार असायला हवेत. म्हणजे पांढरा, ङ्गिकट गुलाबी, लेमन यलो, फ्लोरोसंट ग्रीन अशी सौम्य रंगसंगतीतील भिंती असेल तर लाल, जांभळ्या वा गडद पेस्टल रंगांची ङ्गुले निवडा. मात्र भिंती ऑरेंज वा इतर गडद रंगसंगतीतल्या असतील, तर पांढर्या, ङ्गिकट गुलाबी रंगाची ङ्गुले जास्त उठावदार दिसतील. पण एक काळजी मात्र घ्यावी ती म्हणजे, तुम्ही लांब देठाची ङ्गुले निवडत असाल, तर ती मध्यभागी ठेवण्यापेक्षा कोणाचेही सहज लक्ष जाईल अशा कोपर्यातील ङ्गुलदाणीत त्यांची मांडणी करावी.
फ्लोटिंग कँडल या गृहसजावटीतील नव्या प्रकारानेही भारतीय बाजारपेठांमध्ये चांगले बस्तान बसवले आहे. सणांना वा घरात मंगलकार्य असताना, हल्ली या फ्लोटिंग कँडलच्या मदतीने आकर्षक सजावट करता येते आणि घरातही नावीन्य जाणवते. एका पसरट भांड्यात विशेषत: ‘अँटिक टेक्श्चर’ असलेल्या आपल्या पारंपरिक घंगाळ्यात पाणी आणि त्यावर ङ्गुलांच्या पाकळ्या पसरून त्यात या पेटलेल्या कँडल सोडल्यास त्या खोलीला एक वेगळाच छान लुक येतो. तुम्ही यात वेगवेगळ्या रंगाचे पाणी आणि दगडगोटे ठेवूनदेखील हे सजवू शकतात. या कँडल वेगवेगळ्या ङ्गुलांच्या आकारातही उपलब्ध आहेत. टीपॉयवर या फ्लोटिंग कँडल ठेवा, जेणेकरून घरी येणार्यांचे तिकडे पटकन लक्ष जाईल. एका काचेच्या भांड्यात कुंकू वा हळद घातलेले रंगीत पाणी आणि त्यावर झेंडूच्या पाकळ्या पसरून याला एकदम पारंपरिक लुक देऊ शकता.
आपल्याकडे वीज नव्हती, त्यावेळी तेलावर वा रॉकेलवर पेटणार्या कंदिलांचा वापर केला जायचा. जुन्या चित्रपटांमध्ये वा आजही खेड्यापाड्यात असे कंदील तुम्हांला पाहायला मिळतील. ङ्गक्त उजेड मिळवण्याकरता वापरण्यात येणार्या या कंदिलांचा वापर आता तुम्ही सजावटीसाठीही करू शकता. सणासुदीच्या दिवसांत तुमच्या घराला जर पारंपरिक लुक द्यायचा असेल तर तुमच्यासाठी कंदीलचा पर्याय खूपच ‘युनिक’ आहे. कारण काही मोठ-मोठी हॉटेल्स, क्लब्ज् सोडली तर खूप कमी ठिकाणी याचा सजावट म्हणून वापर झालेला दिसतो. आजकाल बाजारात सजावटीसाठी वापरण्यात येणार्या कंदिलांवर सुंदर, बारीक कलाकुसर वा नक्षीकाम केलेले असते, असे कंदील पटकन नजरेत भरतात. लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी अशा वेगवेगळ्या रंगाच्या काचांमध्ये हे तुम्हांला बाजारात मिळतील. पण तुम्हांला यात अजून पारंपरिकता हवी असल्यास कुलाबा, क्रॉङ्गर्ड मार्केटमध्ये असे अँटिक कंदील नक्की मिळतील.
राजस्थानी कला अगदी सहज डोळ्यात भरते, ती त्याच्या उठावदार रंगांमुळे आणि बारीक कलाकुसरीमुळे! भारतातच नव्हे तर परदेशातही ही कला दिवसेंदिवस प्रसिद्ध होत चालली आहे. त्यातूनही रंगीबेरंगी कापडापासून बनवलेले मोर, हत्ती, उंट यांच्या आकारातले ‘गोटावर्क’ केलेले वॉल आणि डोअर हँगिंग बाजारात उपलब्ध आहेत. दरवाजाला हे हँगिंग लटकवल्यावर खूप छान दिसतात. तुम्ही राजस्थानी कठपुतळीचा खेळ बघितला असेलच. किमान सिनेमात तरी पाहिला असेलच; पण याच कठपुतळ्या तुम्ही हॉलमध्ये सजावटीकरताही वापरू शकता. राजस्थानची पारंपरिक वस्त्रे घातलेल्या कठपुतळ्यांची जोडी बाजारात मिळते. घर सजवताना एक ते दीड ङ्गुट उंच असलेलीच जोडी निवडा. काचेच्या तुकड्यांनी सजावट केलेल्या मानवी प्रतिकृतीचे शो-पीसही सध्या बाजारात आले आहेत. त्यातल्या काचेवरील कोरीव कामामुळे ते अधिकच सुंदर दिसतात. राजस्थानी कलाकुसर केलेले लाकडी हत्ती, उंटाचे शो-पीसही तुम्ही घेऊ शकता. एकूण काय तर शक्य असेल, तेव्हा घराची सजावट बदलत राहावी, तरच घरचे वातावरण अधिक नावीन्यपूर्ण आणि चैतन्यमय बनते.
पावसाळा हा ऋतू काही बाबतीत एकदम निरुत्साही असतो. विशेषत: घरसजावटीच्या किंवा घरात डागडुजी वा बदल करण्याच्या दृष्टीने. पावसाचे ओले दिवस सरल्यानंतर हळूहळू उत्साहजनक वातावरण पसरत जाते. याच सुमारास सण-उत्सवांचे पर्व सुरू होत असल्याने घरासाठी आवश्यक गोष्टी करायला हरकत नसते. किंबहुना त्यासाठी हीच योग्य वेळ आहे.
रंगकाम आणि घराच्या डागडुजीचे काम पावसाळ्याआधी केलेले नसल्यास सणांआधी घर सुसज्ज आणि छान बनवू शकता. या कामांसाठी पूर्वतयारी म्हणून रंगकामाविषयी कंत्राटदार ठरवून ठेवणे, रंगांची निवड आधीच करणे, सुतारकाम करायचे असल्यास संबंधित माणसाशी आधीच चर्चा करणे, घराची रंगसंगती ठरल्यावर कुठे आणि कसे वॉलपेपर्स लावायचे आहेत ते ठरवणे, घराची ङ्गरशी बदलायची असल्यास टाइल्सची निवड करणे, दिव्यांची निवड करणे यांसारख्या अनेक कामांची आखणी तुम्ही करू शकता. जेणेकरून नंतर धावपळही कमी होईल आणि वेळही वाचेल.
स्वयंपाकघरातील नवनवीन उपकरणे, भांडी यांवरही या वेळी सवलती सुरू असतात. सणांच्या निमित्ताने नवनवीन उत्पादने बाजारात येत असतात. या वेळी शक्य असल्यास काही दुकानदार देत असलेल्या ‘एक्स्चेंज ऑङ्गर्स’चा ङ्गायदा तुम्ही घेऊ शकता. पावसाळ्यात घराच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही बरीच काळजी घेतलेली असते. उदाहरणार्थ; घरात ठेवण्याजोग्या झाडांची बदललेली रचना, कपडे वाळविण्यासाठी घरात वा माळ्यावर बांधलेल्या दोर्या वा कपडे वाळत घालण्याची मांडणी घरात उभारणं, पावसाळ्यात जास्त पाणी टिपून घेण्यासाठी वापरली जाणारी पायपुसणी, बैठ्या चाळीतील घर असल्यास पावसाळ्याचे पाणी घरात येऊ नये म्हणून दरवाजात लावली जाणारी ङ्गळी. या वस्तूंची पावसाळ्यानंतर काहीच गरज पडत नाही. त्यामुळे पुढील पावसाळ्यात या वस्तूंचा पुनर्वापर करण्यासाठी त्या व्यवस्थित स्वच्छ करून कोरड्या राहतील अशा प्रकारे बांधून ठेवाव्यात. दिवाळीसारख्या मोठ्या उत्सवांआधी काही ब्रँड्स आणि मोठमोठी दुकाने सवलती जाहीर करतात. म्हणूनच मोठमोठ्या स्टोअर्समध्ये याच काळादरम्यान ‘एंड ऑङ्ग द सीझन सेल’ असतात. अशा सेलमध्ये अनेकदा चांगल्या वस्तूदेखील कमी वा निम्म्या किमतीत मिळतात. ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाइट्सवरदेखील भरपूर सवलती या वेळी सुरू असतात. या सवलतींचा घरबसल्या ङ्गायदा घेता येतो. बर्याच वेळा मोठमोठी स्टोअर्स आपल्या सदस्य असलेल्या ग्राहकांना त्यांच्याकडे लागणार्या सेलविषयी मोबाइल तसेच ई-मेलवर वेळोवेळी सूचना, संदेश कळवतात. त्यांचा योग्य फायदा उठवून आम्ही उत्सव अधिक आनंददायी नक्कीच बनवू शकतो.
……….