Home बातम्या 9 काँग्रेस कार्यकर्त्यांनाअखेर जामीर मंजूर

9 काँग्रेस कार्यकर्त्यांनाअखेर जामीर मंजूर

0

एआय समिटमध्ये शर्टलेस आंदोलन प्रकरणी अटक केलेल्या इंडियन यूथ काँग्रेसच्या नऊ कार्यकर्त्यांना दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. हे आंदोलन केवळ सरकारवर टीका करण्याचा एक मार्ग होता. त्यामुळे खटला सुरू होण्यापूर्वी कोणालाही तुरुंगात ठेवणे कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान केलेली घोषणाबाजी भडकाऊ नव्हती. त्यांना कोणताही धार्मिक किंवा प्रादेशिक रंग नव्हता. कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा लोकांना घाबरवल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही, असेही न्यायालयाने जामीन मंजूर करताना नमूद केले. कृष्ण हरी, नरसिंह यादव, कुंदन कुमार यादव, अजय कुमार सिंह, जितेंद्र सिंह यादव, राजा गुर्जर, अजय कुमार विमल उर्फ बंटू, सौरभ सिंह आणि अरबाज खान यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.