Home बातम्या 75 शेतकऱ्यांना1 लाख रुपये देणार

75 शेतकऱ्यांना1 लाख रुपये देणार

0

राज्य सरकारने मिठागर पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत 75 शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील मिठागरांसाठी पुनरुज्जीवन योजना राबविण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारने 2025-26 साठी मिठागर संवर्धन, समर्थन आणि पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत मिठागर लागवड करणाऱ्यांसाठी एक वेळची आर्थिक मदत योजना मंजूर केली आहे. या योजनेखाली एकूण 95 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेखाली 75 मिठागर शेतकऱ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या दराने थेट मदत म्हणून 75 लाख रुपयांचे वितरण केले जाणार आहे. उर्वरित रक्कम मिठागर समर्थन युनिटचे पगार आणि प्रशासकीय खर्चासाठी वापरली जाणार आहे.