Home बातम्या 64 संसदीय मैत्रीगटांची निर्मिती

64 संसदीय मैत्रीगटांची निर्मिती

0

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी भारत आणि इतर देशांमधील संवाद वाढवण्यासाठी 64 संसदीय मैत्री गट (पार्लियामेंट्री फ्रेंडशिप ग्रुप्स) बनवले आहेत. 18 व्या लोकसभेंतर्गत स्थापन झालेल्या या गटांमध्ये विविध पक्षांचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार समाविष्ट आहेत. त्यात प्रत्येक देशासाठी एक गटप्रमुख आणि 10 सदस्य आहेत. भाजपचे सर्वाधिक 28 गटप्रमुख आहेत. काँग्रेसचे 9, समाजवादी पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि तृणमूल काँग्रेसचे प्रत्येकी 3 खासदार गटप्रमुख बनवण्यात आले आहेत. गटप्रमुखांमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर आणि टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांचाही समावेश आहे. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया ही माहिती दिली. त्यांनी 64 देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गटप्रमुखांची आणि उर्वरित सदस्यांची यादी प्रसिद्ध केली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान मोदींनी भारत आणि इतर देशांमधील संवाद वाढवण्यासाठी संसदीय मैत्री गट (पार्लियामेंट्री फ्रेंडशिप ग्रुप्स) स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावानुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आता या संसदीय मैत्री गटांची औपचारिक स्थापना केली आहे.