Home बातम्या 390 शिक्षकांचीभरती होणार

390 शिक्षकांचीभरती होणार

0

गोवा राज्य कर्मचारी निवड आयोगाने राज्यातील मराठी माध्यमाच्या सरकारी प्राथमिक शाळांमध्ये 352 आणि कोकणी माध्यमाच्या शाळांमध्ये 38 शिक्षकांच्या भरतीची जाहिरात काल प्रसिद्ध केली. सरकारी प्राथमिक शिक्षक भरतीसाठी येत्या 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. राज्य कर्मचारी निवड आयोगाने वर्ष 2026 मधील पहिली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांतील 352 जागांपैकी 158 जागा सर्वसामान्य प्रवर्गासाठी आहेत. तर एसटी 42, एससी 4, ओबीसी 113, ईडब्लूएस प्रवर्गाकरिता 35 जागा राखीव आहेत. 352 जागांपैकी 16 जागा दिव्यांग, 7 जागा माजी सैनिक, 8 जागा क्रीडापटू यांच्यासाठी राखीव आहेत. कोकणी माध्यमाच्या 38 पैकी 19 जागा सर्वसामान्य प्रवर्ग, 15 ओबीसी, 4 ईडब्लूएस, 38 पैकी 8 जागा दिव्यांगासाठी राखीव आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी सीबीटी परीक्षा घेतली जाणार आहे. अर्जदाराकडे उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होण्याबरोबरच डी. एड. किंवा बी.ई.आय.ईडी, बी.एड्‌‍ (सहा महिन्यांचा ब्रीज अभ्यासक्रम आवश्यक) अशी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडे सरकारी मान्यता प्राप्त शाळेत दोन वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे.