Home Featured 1250 परप्रांतीयांची पोलिसांकडून पडताळणी

1250 परप्रांतीयांची पोलिसांकडून पडताळणी

0

राज्यात 30 ठिकाणी नाकाबंदी, गस्त वाढवली

राज्यातील बायणा वास्को येथील दरोडा, वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा पोलिसांनी परप्रांतीयाची पडताळणी, नाकाबंदीवर भर दिला आहे.
उत्तर गोवा पोलिसांकडून गोवा पोलीस ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने परप्रांतीयाची पडताळणी केली जात आहे. आत्तापर्यंत 1250 परप्रांतीयाची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच, उत्तर गोव्यात रात्रीच्या वेळी 30 ठिकाणी नाकाबंदी केली जात असून वाहनाची तपासणी केली जात आहे. रात्रीच्या वेळीच्या नाकाबंदीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रात्रीची पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. पोलीस गस्तीवर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील 105 भंगार अड्डे आणि भंगार गोळा करणाऱ्याची पडताळणी केली जात आहे. भंगार अड्ड्यावर काम करणाऱ्या एका व्यक्तीकडे बोगस आधारकार्ड आढळून आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.