२४ तासांत ४२ मृत्यू, १६२१ बाधित

0
113

>> रविवारी २५४५ जण कोरोनामुक्त

राज्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. काल रविवारी कोरोनामुळे ४२ जणांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाबाधित १६२१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे सध्याची कोरोनाची रुग्णसंख्या १७,२७७ एवढी झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २३८३ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,४६,४६० एवढी झाली आहे.
काल राज्यात २५४५ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,२६,८०० एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५८ टक्के तर कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण ३५.४८ टक्के इतके झाल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

काल दिवसभरातील चोवीस तासांत राज्यात एकूण ४५६८ एवढ्या स्वॅबच्या चाचण्या करण्यात आल्या. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १४५५ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर १६६ नवे रुग्ण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत. दरम्यान, काल रविवारी कोरोनामुक्त झाल्यामुळे इस्पितळातून १४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४२ जणांचा मृत्यू
काल राज्यात कोरोनामुळे ४२ जणांचा मृत्यू झाला. त्यात बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात २९, मडगावच्या जिल्हा इस्पितळात ११ जणांचा, कुडतरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाचा तर दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात एकाचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतलेल्या चौघांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग झालेल्या २५,४७३ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर ९७,५१६ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ७,८७,९७७ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी

मडगावात सर्वाधिक रुग्ण
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या मडगावात असून ती १७७५ एवढी झाली आहे. पणजीत त्या खालोखाल म्हणजे ९७३,फोंडा ९२२, चिंबल ८०६, पर्वरीत ६६९, कांदोळी ७५८, कासावली ६९१, कुठ्ठाळी ६९३, पेडणे ६५२, वास्को ६०३ अशी सध्याची रुग्णसंख्या आहे.