देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्युसंख्येत किंचित घट

0
57

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर देशातील दररोज साडेचार लाखांच्या आसपास मिळणारे रुग्ण आता कमी होऊ लागले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ३० लाखांच्या खाली आली आहे. त्याचप्रमाणे देशातील मृतांची दररोजची सरासरीही खाली येताना दिसत आहे. देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांत करोनामुळे तीन हजार ७४१ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी शुक्रवारी मृत पावलेल्या रुग्णांच्या प्रमाणात कमी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या गेल्या चोवीस तासांच्या आकडेवारीनुसार दोन लाख ४० हजार ८४२ नवीन कोरोनबाधित आढळून आले आहेत. तर तीन लाख ५५ हजार १०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशात तीन हजार ७४१ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ९९ हजार २२६ झाली आहे.