१६ सरकारी शाळा बंद

0
83

>> विद्यार्थी नसल्याने परिणाम

 

एका बाजूने प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हावे यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच आदोलन करीत आहे तर दुसर्‍या बाजूने सरकारी प्राथमिक शाळा बंद पडण्याचे प्रमाण वाढू लागले असून चालू शैक्षणिक वर्षात १६ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत, अशी माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिली.
बंद पडलेल्या शाळांमध्ये ङ्गोंडा तालुक्यातील ५, सासष्टीतील २, पेडणे २, काणकोण ३, वास्को १, सत्तरी २ व डिचोलीतील एका शाळेचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी राज्यात अकराशे पेक्षा अधिक सरकारी प्राथमिक शाळांचा समावेश होता. आता राज्यात एकूण ७८० सरकारी प्राथमिक शाळा शिल्लक राहिल्या आहेत. अस्तित्वात असलेल्या शंभरांवर शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अल्प असून काही शाळा जीवंत राहाव्या म्हणून पालकांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु विद्यार्थी नसल्याने शाळा बंद करण्याची पाळी सरकारवर आली आहे.
ग्रामीण भागातील पालकही आपल्या पाल्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून शहरी भागातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये पाठविणे पसंत करतात. मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण व्हावे म्हणून कितीही प्रयत्न चालविले तरी इंग्रजी माध्यमातील शाळांमध्येच विद्यार्थ्यांना पाठविण्याचा पालकांचा कल आहे. यावर्षी १६ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या, पुढील वर्षी आणखी काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.