वास्कोतील दुकानदारांना युवतीकडून लाखोंचा गंडा

0
68

येथील एमपीटी कॉलनीतील एका युवतीने वास्को शहरातील सात ते आठ दुकानदारांना सुमारे १३ लाख रुपयांना ङ्गसवल्याची तक्रार दुकानदारांनी वास्को पोलीस स्थानकात नोंदविली आहे. प्राप्त माहितीनुसार येथील मिठाईवाले, कपड्यांचे व्यापारी, भांडीवाले, भुसारी व्यापारी व इतर प्रकारच्या दुकानदारांना मिळून सुमारे १३ लाख रुपयांना गंडा घातल्याची तक्रार वास्को पोलीस स्थानकात दाखल केली आहे. सदर युवतीने या दुकानदारांकडून उधारी व घरगुती तसेच इतर साहित्य खरेदी करून त्यांना संबंधित रकमेचे धनादेश दिले होते. यात प्रत्येक दुकानदाराकडून लाखभर रुपयांची खरेदी करण्यात आली होती. सदर युवती प्रत्येक दुकानदारांना व्हीपीके अर्बन को. क्रे. सोसायटी, वास्को शाखेचे धनादेश दिले होते. दरम्यान, दुकानदारांनी धनादेश वटवण्यासाठी त्यांच्या खात्यात जमा केले असता आवश्यक रक्कम खात्यात शिल्लक नसल्याने बँकेने ते परत केले. या घटनेला तीन महिने होऊन गेले तरी दुकानदारांना ती रक्कम न मिळाल्याने त्यांनी तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिने दिलेला भ्रमणध्वनी क्रमांकही तिचा नसल्याचे आढळून आल्याने ङ्गसवलो गेल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या युवतीविरुद्ध वास्को पोलीस स्थानकात ङ्गसवणुकीची तक्रार नोंद केली.