Home बातम्या होर्मुझ सामुद्रधुनी खुली न केल्यास वीज केंद्रे व पूल उद्ध्वस्त करू

होर्मुझ सामुद्रधुनी खुली न केल्यास वीज केंद्रे व पूल उद्ध्वस्त करू

0

अमेरिकेने दिली इराणला धमकी

जर इराणने लवकरात लवकर करार केला नाही, तर सर्व काही उडवून देण्याचा आणि तेल ताब्यात घेण्याचा मी विचार करत आहे. इराणमद्ये आता पूल आणि वीज प्रकल्प कोसळताना दिसतील. मात्र काही इराणी अधिकारी सध्या चर्चा करत आहेत. त्यामुळे मला वाटते की सोमवारपर्यंत करार होण्याची दाट शक्यता आहे असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोन्लाड ट्रम्प यांनी दावा केला आहे.

ट्रम्प यांनी इराणला वीज प्रकल्प आणि पुलांवर मंगळवारी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही तर इराणवर आतापर्यंत झाला नाही असा मोठा हल्ला करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी रविवारी सोशल मीडियावर, मंगळवारी इराणमध्ये वीज प्रकल्प दिन आणि पुलावर एकाच दिवशी हल्ला करणार असून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही तर ते नरकात पोहोचेल असा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी इराणला होर्मुज उघडण्याचा किंवा समझोता करण्यासाठी मंगळवारपर्यंत मुदत दिली आहे. वेळ संपत आली असून इराणने यातील काही न केल्यास इराणच्या ऊर्जा ठिकाणांना लक्ष्य करून नष्ट केले जाईल असा इशारा दिला.
यापूर्वी गुरुवारी, अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानला कराज शहराशी जोडणाऱ्या बी1 महामार्गावरील पुलावर हल्ला केला होता. सुमारे 1050 मीटर लांब आणि 136 मीटर उंच असलेला हा पूल यावर्षी खुला करण्यात आला असून तो मध्य पूर्वेतील सर्वात उंच पूल मानला जातो.

इराणने इशारा फेटाळला
इराणने ट्रम्प यांनी दिलेली 48 तासांत होर्मुज उघडण्याची मुदत फेटाळून लावली असून अमेरिका हतबल होऊन आणि घाबरून धमक्या देत असल्याचे म्हटले आहे. शनिवारी इस्रायलने इराणच्या वायव्येकडील तबरीज शहरात एका मोबाईल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लाँचरवर हल्ला केला आहे. तर इस्रायलमधील किर्यात शमोना येथे शनिवारी प्रोजेक्टाइल पडल्याने स्फोट झाला. इराणी रेड क्रेसेंट सोसायटीने सांगितले की, फार्स प्रांतात एका रुग्णवाहिकेवर हल्ला झाला. ही रुग्णवाहिका एका बचाव मोहिमेवर होती. मात्र, चालकाने ऐनवेळी बाहेर उडी मारल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

इराणच्या विमानतळाला लक्ष्य
अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला चढवला.
इराणी प्रसारमाध्यमांनुसार, अमेरिका आणि इस्रायलने अहवाजमधील कासिम सुलेमानी आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य केले. तथापि, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.