हेमंत सोरेन यांच्या शपथविधीसाठी ‘इंडिया’तील बड्या नेत्यांना निमंत्रण

0
4

झारखंडच्या नव्या सरकारच्या गुरुवार दि. 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी रांचीमध्ये सुरू आहे. त्याचरोबर हेमंत सोरेन यांच्या चौथ्या शपथविधी सोहळ्याला इंडिया आघाडीतील सर्व मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजदचे नेते तेजस्वी यादव, दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह अन्य बडे नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जेएमएमचे प्रवक्ते मनोज पांडे यांनी दिली.
रांची येथील मोरहाबादी मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सोमवारी रांचीचे डीसी वरुण रंजन यांनी शपथविधी स्थळाचा आढावा घेतला. या शपथविधी सोहळ्याला झारखंडमधील दूरदूरच्या भागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अतिथी, प्रतिष्ठित व्यक्तींव्यतिरिक्त, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात हेमंत सोरेन यांच्यासह 10 ते 11 मंत्री शपथ घेऊ शकतात. इंडिया आघाडीने नवीन मंत्रिमंडळासाठी 5:1 चा फॉर्म्युला ठरवला आहे.