>> १२ नोव्हेंबरला मतदान; ८ डिसेंबरला मतमोजणी
केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल विधानसभा निवडणुकीची तारीख काल जाहीर केली. हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक एकाच टप्यात होणार असून, कालपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन हिमाचल प्रदेशमध्ये कुणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. दुसर्या बाजूला गुजरात विधानसभा गुजरातच्या विधानसभा निवडणुकीबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नाही. पुढील आठवड्यात गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत हिमाचल विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. हिमाचलमध्ये ५५ लाख ०७ हजार २६१ मतदार आहेत. त्यामध्ये २७ लाख ८० हजार पुरुष मतदार आहेत, तर २७ हजार २७ महिला मतदार आहेत. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असणारे एक लाख २२ हजार मतदार आहेत. पहिल्यांदाच मतदान करणार्या तरुणांची संख्या १ लाख ८६ हजार इतकी आहे. हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ जानेवारीला संपतो आहे. त्यामुळे नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणे गरजेचे आहे.
१७ पासून उमेदवारी अर्ज
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी मतदान होणार आहे. १७ ते २५ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी, तर २९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेता येतील.