हिजाब वाद प्रकरणी निर्णय राखून ठेवला

0
12

मुस्लिम विद्यार्थिनींनी दाखल केलेल्या याचिकांवर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने शुक्रवारी आपला निर्णय राखून ठेवला. हिजाब घातलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्याच्या सरकारी पीयू महाविद्यालयाने केलेल्या कारवाईला या याचिकांमध्ये आव्हान देण्यात आले होते. मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित आणि न्यायमूर्ती जे. एम. खाजी यांच्या पूर्ण खंडपीठासमोर ११ दिवस सुनावणी चालली. त्यानंतर काल खंडपीठाने निर्णय राखून ठेवला.