हडफडे येथील अपघातात स्कूटरस्वार मृत्यूमुखी

0
69

हडफडे येथील पुलाजवळ समोरासमोरुन येणार्‍या दोन दुचाकींची टक्कर होऊन झालेल्या अपघातात स्कूटर वरील अंकुश बाणावलीकर हा ६० वर्षीय सीमवाडा-हडफडे येथील दुचाकीस्वार मरण पावला. याबाबत कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए ०३ पी ७८६३ ही मोटारसायकल घेऊन महम्मद रफी दादावीर बेसासले (१९) उसकई-बार्देश हा कळंगुटहून हडफडे येथे जात होता. तर त्याच्या विरुध्द दिशेने जीए ०३ एए ८६६९ या एक्सेस १२५ या स्कूटरवरून अंकुश बाणावलीकर हा येत असताना दोन्ही दुचाकीची समोरासमोर टक्कर झाली. त्यात अंकुश बाणावलीकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता. दुपारी त्यांचे उपचार चालू असताना निधन झाले. या अपघात प्रकरणी नितेश अंकुश बाणावलीकर यांनी कळंगुट पोलीस स्थानकात तक्रार दिली असता पोलीस उपनिरीक्षक विदेश पिळगांवकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.