६०० विद्यालयांच्या नोंदणीचे ऑनलाईन पध्दतीने नूतनीकरण

0
79

गोवा शालांत आणि उच्च माध्यमिक मंडळाने ऑनलाईन पध्दतीने राज्यातील ६०० विद्यालयांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्याचे हाती घेण्याचे ठरविले आहे. मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार वरील विद्यालयांना मान्यता दिली जाते. निकष पूर्ण न करणार्‍या संस्थांची मान्यता रद्द करण्याची तरतूद आहे. त्यामुळेच नूतनीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल, असे मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. मंडळाने सध्या ऑनलाईन पध्दतीवर अधिक भर देण्याचे ठरविले असून भविष्यकाळात कागदाचा कमीतकमी वापर व्हावा हा त्यामागील हेतू आहे. सध्या दहावी व बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने केली असून २०१५च्या परिक्षेचा तपशील तयार करण्याच्या कामास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यालयाच्या नूतनीकरणासाठीचे शुल्क आकारण्यासाठी बँकांकडे संबंध जोडण्यासाठी प्रयत्न चालविल्याचे त्यांनी सांगितले. आठवीपर्यंत उत्तीर्ण करण्याच्या योजनेमुळे दहावी व बारावीच्या परीक्षेस बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत बरीच वाढ झाली असून दरवर्षी किमान ३५ ते ३६ हजार विद्यार्थी या परिक्षेसाठी नोंदणी करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.