सामाजिक कार्यकर्ते आणि आर्य समाजाचे प्रसिद्ध नेते स्वामी अग्निवेश (८०) यांचे काल नवी दिल्ली येथे निधन झाले. त्यांना सोमवारी तब्येत बिघडल्यामुळे नवी दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल केले होते. स्वामी अग्निवेश यांना शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता हृदयविकाराचा झटका आला व ६.३० वा. त्यांचे निधन झाले. यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त झालेल्या स्वामी अग्निवेश यांच्या अनेक अवयवांनी काम करणे थांबवले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.