‘स्वाइन फ्लू’चे देशभर थैमान

0
96

देशभरात स्वाइन फ्लूने कहर माजविला असून गेल्या वर्षभरात या रोगाने ५८५ जण दगावले आहेत. गेल्या तीन दिवसांत या रोगाने तब्बल १०० जणांचे बळी घेतले आहे. विशेषत: राजस्थान, गुजरात, मध्ये प्रदेश आणि महाराष्ट्रात ही साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. राजधानी दिल्ली तसेच तामिळनाडूमध्येही या रोगाने रुग्ण दगावले आहेत. १२ ते १५ फेब्रुवारीपर्यंत या रोगाने १०० जणांचा बळी गेला आहे. या वर्षात ८४२३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व राज्यांमध्ये आरोग्य पथके कार्यरत असून केंद्र सरकारने आवश्यक औषधे तसेच मास्कही पाठविले आहेत.