आसामात ७ नक्षलवाद्यांना अटक

0
91

येथील पोलीस आणि भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी काल संयुक्तपणे केलेल्या कारवाईत कारबी पीपल्स लिबरेशन टायकरच्या (केपीएलटी) ७ नक्षलवाद्यांना शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात यश आले आहे. ही मोहीम तब्बल १६ तास चालली होती अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. नक्षलवाद्यांकडून एके मालिकेतील रायफल, दोन पिस्तूल, एक ग्रेनेड लॉंचर, एके रायफलच्या १४ गोळ्या तसेच पिस्तुलाच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.