स्वच्छता मोहिमेत सहभागासाठी सरकारी कर्मचार्‍यांना आदेश

0
80

सरकारने जारी केलेल्या एका आदेशाद्वारे गुरुवार दि. २ ऑक्टोबरला गांधी जयंती दिनी सर्व सरकारी कर्मचार्‍यांना सकाळी ९ वाजता संबंधित कार्यालयांमध्ये उपस्थित राहून स्वच्छतेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले आहे. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांना दोन तास आपल्या कार्यालयांमध्ये हजर राहावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा हा भाग आहे. महात्मा गांधीनी स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले. ते स्वतः झाडू हातात घेऊन काम करीत होते. त्यामुळेच सरकारी कर्मचार्‍यांना २ ऑक्टोबरचे महत्त्व कळावे म्हणून वरील कार्यक्रम राबविण्याचे सरकारने ठरविले आहे.