मगोशी युती तोडण्याचे मत कार्यकर्त्यांचे : पर्रीकर

0
92

मगोशी युती तोडण्याची मागणी प्रदेश भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत दोन दिवसांपूर्वी झाली ते त्या कार्यकर्त्यांचे वैयक्तिक मत होते, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यासंबंधी विचारले असता सांगितले. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे, तसे कुणी केले तर काय बिघडले असे मुख्यमंत्री म्हणाले.
४० आमदारांच्या विधानसभेत भाजपकडे २१ आमदार म्हणजे पूर्ण बहुमत आहे. मगोचे ३ आमदार सरकारसोबत आहेत. दरम्यान, प्रत्येक पक्षात वेगवेगळ्या मतांची माणसे असतात, ते मत भाजपमधील काही कार्यकर्त्यांचे असावे, असे ढवळीकर म्हणाले.