स्कॉटलंडचे भवितव्य आज ठरणार

0
88
स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी घेण्यात आलेल्या सार्वमताचा निकाल आज घोषित होणार असून पूर्वसंध्येला यु.के.चा युनियन जॅक व स्कॉटलंडचा ध्वज एकत्रितपणे फडकावताना एक युवक.

ग्रेट ब्रिटनमधून बाहेर पडून स्वतंत्र राष्ट्र व्हावे की इंग्लंडसोबतच राहावे, यामुद्द्यावर काल स्कॉटलंडवासीयांनी सार्वमतासाठी मतदान केले. स्कॉटलंडमधील सुमारे ९७ टक्के म्हणजे ४०.३ लाख पात्र मतदारांनी जनमत कौलासाठी नोंदणी केली होती. काल मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. स्कॉटलंड स्वतंत्र राष्ट्र झाल्यास केवळ इंग्लंडचीच नव्हे तर एकुण युरोपीय संघाची समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने एकुणच आंतरराष्ट्रीय समुदायाचे या जनमत कौलाकडे लक्ष लागून राहिले आहे. सार्वमताचा निकाल आज जाहीर होईल.