बंद शाळा इमारतींत भरणार अंगणवाड्या

0
90

राज्यातील बंद असलेल्या शाळा इमारतींचा उपयोग अंगणवाडी केंद्रे म्हणून करण्यात येणार आहे. सध्या शंभर अंगणवाडीसाठी या शाळा इमारतीत हलविण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू आहे. आपल्या खात्याने शिक्षण खात्यासमोर प्रस्ताव ठेवल्याचे महिला बालविकास खात्याचे संचालक विकास गावणेकर यांनी सांगितले.
शिक्षण खात्याच्या जवळ जवळ सर्वच शाळा इमारतींचा कमी वापर होत आहे. अशा इमारतींचाही बालवाडीसाठी उपयोग करण्याचे ठरविले आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वरील शाळा इमारतीचा बालवाडीसाठी वापर करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले होते. अशा इमारतींची पहाणी करण्याचे काम चालू असल्याचे ते म्हणाले.