Home बातम्या सोनसोडोतील डोंगर कापणी चालू ठेवल्यास न्यायालयात जाणार

सोनसोडोतील डोंगर कापणी चालू ठेवल्यास न्यायालयात जाणार

0

या सभेत रायचे सरपंच झेवियर फर्नांडिस, बिगर सहकारी संस्थाचे राजू अय्यर, इझिदोर रॉड्रिगीस यांची भाषणे झाली.

कचरा प्रकल्पासाठी कचरा घालण्यास आणखी जागा हवी असल्याने नगरपालिकेच्या परवानगीने डोंगर कापून ती माती नुवे येथील बगल रस्त्याच्या भरावासाठी वा वास्को येथे नेली जात होती. गुरुवारी ती वाहूतक राय व कुडतरीच्या रहिवाशांनी बंद पाडली. त्यावेळी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेंस उपस्थित होते. त्यादिवशी लोकांनी माती वाहतूक करणारे तीस ट्रक अडविले होते. तसेच मडगाव पोलीस स्टेशन व जिल्हाधिकारी कार्यालयात दोन बैठका झाल्या. पण काहीच निष्पन्न झाले नव्हते.

काल झालेल्या सभेत या वाहतुकीमुळे धूळ प्रदूषण होते व रस्त्यावर माती पडून अपघाताची शक्यता आहे. फोमेंतोने कोणतीच परवानगी न घेता डोंगर कापणी चालविली असून त्या सरकारी खात्यांचे अधिकारी सहाय करतात, असा दावा करण्यात आला. बेकायदेशीरपणे डोंगर कापणे व माती वाहतूक करीत असतानाही संबंधित सरकारी अधिकारी कोणतीच कारवाई करीत नसल्याबद्दल वक्त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. एका वर्षामागे फोमेंतोने हा प्रकल्प सुरू केला. तरी स्थितीत कोणताच बदल झाला नाही. दुर्गंधी तशीच येते व पाणी वाहत आहे. त्याचा त्रास राय व कुडतरी लोकांना भोगावा लागतो, असे वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

ही माती वाहतूक सोमवारपासून सुरू केल्यास ते बंद पाडू व माती वाहतुकीविरोधात न्यायालयात जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.