सैनिकांनी दुप्पट ताकदीने प्रतिकार करावा : पर्रीकर

0
105

जम्मू व काश्मीर सीमेवर पाकिस्तानने भारताची कुरापत काढली, तर भारताने दुप्पट ताकदीने प्रतिकार करावा असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल बजावले. ‘‘आक्रमक होऊ नका, पण मागे न हटता योग्य प्रतिकार करा. जेव्हा काही घडेल तेव्हा दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर द्या’’ असे पर्रीकर यांनी सांगितले. पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार चालविल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. गेल्या ऑक्टोबरमध्ये अशाच गोळीबारात वीस नागरिक मारले गेले होते.
सांबा सेक्टरमधील सुचेतागढ भागात एका लष्करी पथकावर पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान काल ठार झाला. शिपाई श्रीराम गोवरिया असे त्याचे नाव असून दुसरा एक जवान या गोळीबारात जखमी झाला आहे. युद्धबंदीचे गेल्या २४ तासांतील हे दुसरे उल्लंघन आहे.