सेल.. सेल.. सेल!

0
129

सौ.अंजली विवेक मुतालिक (कुडाळ)

 

रांगोळी काढण्यासाठी सेलमधून वेगवेगळे पेन, चाळणी, गाळणी, स्टिकर्स खरेदी करतात अन् सणाला स्वतःच्या पाचही बोटांचा
सुरेख वापर करून रांगोळी उत्तम घालतात. कधी कुठल्या सेलमधून कोणी खरंच उपयोगी पडणारे काहीतरी खरेदी करतही असतील. पण बर्‍याचदा ‘भंगार गोळा करणे’ विधी पार पडत असतो.

शहरात कुठेही ‘५०% ऑफ’चा सेल लागला की माझी शेजारची मैत्रीण नेहा आणि माझा संवाद अजूनच वाढतो. ‘ए, भंगार गोळा करायला कधी जाऊया?’ असं एकमेकींना विचारतो अन पुन्हा नव्या जोशात त्यातली मजा अनुभवतो.
व्यवस्थापन व विपणन यांचा सुरेख अभ्यास करून असे सेल भूछत्रासारखे जागोजागी ङ्गैलावत असतात. शिकलेल्या, स्वतःला
आधुनिक मानणार्‍या समस्त स्त्री पुरुष, बच्चे कंपनी यांनाही आकर्षून घेण्याची यांच्यात दिव्य शक्ती असते.
आपले मूल घरी मस्त आई-बाबांच्या सहवासात अभ्यास करत असते पण या सेलमध्ये लावलेले छोटेसे स्टडी टेबल एखाद्या कुटुंबाला
खुणावते. चारदा आपलं गोंडस ध्यान त्यावर बसून अभ्यासाचा कार्यक्रम पार पाडत असते. दोन-चार वेगवेगळ्या अँगलने आपण त्याचे ङ्गोटो घेतो. आजी आजोबा, मामा, काका यांच्या मोबाईलवर काही काळाने ‘डिलीट’ करण्यासाठी ते ङ्गोटो ‘अपलोड’ होतात. अन घराचा किंवा पोटमाळ्याचा एखादा कप्पा हे स्टडी टेबल अडवून बसते. आपला हुश्शार बाळ मस्तपैकी बेडवर किंवा आई पोळ्या लाटताना डायनिंग टेबलवर, खुर्चीवर बसून अभ्यासाला लागतं.
पारंपारिक विळी प्रत्येक घरात असते. त्याला टोकावर दातेरी चकतीही असते. पण या सेलच्या मायाजालात आपल्याला एखादा
कुशल माणूस पटापट कोबी, कांदा किंवा टोमटो कापताना किंवा खोबरे कातताना दिसतो. तिथल्या लाईटच्या झगमगाटात आपली मात्र
दिमाखाची बत्ती गुल होते. आपण तिथले ते मशीन केवळ १०० रुपयात आहे म्हणून घरी आणतो. पण प्रत्यक्ष करून पाहताना त्या
माणसासारखे बारीक होत नाही. मनातल्या मनात **** ङ्गुल्या उच्चारून धडपडत आपण नेहमीप्रमाणे विळीवर बसतो अन सुरेख बारीक कांदा चिरतो. सेलमधून घेतलेले ते यंत्र कुठल्याशा रॅकच्या कोपर्‍यात तोंडावर धूळ थापून लाजून चूर होऊन बसते.
डोकं किंवा पाठ खाजवण्यासाठी मॅग्नेटिक स्टिक सारखी उपकरणं कुठे ठेवली आहेत हे विसरल्यामुळे ङ्गुटपट्टी, झारा, उलथने यांचा
वापर आणीबाणीच्या काळात केला जातो.
स्टेपलर प्रमाणे हाताने वापरायच्या शिलाई मशिनचे तंत्र तेवढयाच मर्यादित कालखंडापर्यंत लक्षात रहाते. अन रॅकचा कोपरा एका
नवीन बॉक्स मुळे सुशोभित होतो.
वेगवेगळ्या राज्यातील पाचक, मुखशुद्धीसाठी वापरले जाणारे आंबटगोड चवीचे आवळा, चिंच, कैरी यांना मसाला लावून केलेले
पदार्थ आवडले म्हणून पाचकासारखे थोडेसे न खाता जिभेला बरे लागले म्हणून संपवले जातात किंवा ङ्ग्रिजच्या दाराकडे सीमेवरच बराच काळ अडकून पडतात. काही काळाने विस्मरणामुळे त्या बरण्या आतील ऐवजासह स्वच्छ धुतल्या जातात अन जागेवर उपड्या होऊन बसतात.
या आणि अशा कितीतरी चमकदार प्लास्टिक, काचेच्या वस्तू अडगळ बनून घरात ठाण मांडून बसतात. दिवाळी-गणपतीत किंवा
सणासुदीला सङ्गाई करताना श्रीखंडाच्या डब्याचे झाकण मिळाले तरीही पुढे कधी डबा मिळेल या आशेवर ते झाकण ङ्गेकून देत नाहीत.
प्लास्टिक पिशव्या वापरायला बंदी असली तरी कायम कापडी थैली बायका बरोबर ठेवतात अन गादीखाली, सोफ्याखाली प्लास्टिक
पिशव्यांची शाळा भरवतात.
रांगोळी काढण्यासाठी सेलमधून वेगवेगळे पेन, चाळणी, गाळणी, स्टिकर्स खरेदी करतात अन् सणाला स्वतःच्या पाचही बोटांचा
सुरेख वापर करून रांगोळी उत्तम घालतात. कधी कुठल्या सेलमधून कोणी खरंच उपयोगी पडणारे काहीतरी खरेदी करतही असतील. पण
बर्‍याचदा ‘भंगार गोळा करणे’ विधी पार पडत असतो. कुणाला असा मस्त सेल लागलाय माहिती असेल तर मला आणि नेहाला जरूर कळवा हं!