सुषमा स्वराज यांचा दौरा आमच्यासाठी महत्त्वाचा : चीन

0
80

भारताच्या विदेश व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढील आठवड्यात होणार असलेल्या चीन दौर्‍याला आपण मोठे महत्त्व देत असल्याचे चीनने म्हटले आहे.प्रस्तावित चीन दौर्‍यादरम्यान होणार्‍या रशिया, चीन व भारत यांच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीतही स्वराज भाग घेणार आहेत. ‘त्यांनी मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच चीन दौरा असून उभय देशांच्या दृष्टीने या दौर्‍याला बरेच महत्त्व आहे’, अशी प्रतिक्रिया चीनच्या विदेश खात्याच्या प्रवक्त्या हुआ चुनयींग यांनी व्यक्त केली आहे. आपल्या चीन दौर्‍यात श्रीमती स्वराज चीनच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत.