मातीच्या ढिगार्‍याखाली चिरडून खोला येथे कामगाराचा मृत्यू

0
81

घराच्या दुरुस्तीचे काम चालू असताना मातीची भिंत कोसळून त्या खाली चिरडून खुशाली वेळीप बागकर (४८) यांचे निधन होण्याची दुर्घटना २८ रोजी घडली. ही दुर्घटना आंबडे-खोला याठिकाणी घडली. मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी एकूण ४ पुरूष आणि २ महिला कामगार काम करीत होते. यावेळी अचानक एक भिंत कोसळली आणि त्या भिंतीखाली सदर कामगार गडला गेला. काणकोणचे पोलीस उपनिरीक्षक ऍडवीन डिकॉस्टा यांनी घटनास्थळी जाऊन पंचनाम्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. मयत वेळीप यांचा एक मुलगा मुंबई येथे कामावर असल्यामुळे सध्या मृतदेह मडगावच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.