सीसीटीव्ही कॅमेरे चोरीप्रकरणी युवतीस अटक

0
95

माडेल-थिवी येथील महेश मोहन शेट्टी यांचे दोन सीसीटीव्ही कॅमेरे चोरल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी काल ललिता रमेश नाईक (२०) घोटणीचा व्हाळ, करासवाडा-म्हापसा येथील युवतीला अटक केली. याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही चोरी २ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी १० ते १०.३० या दरम्यान झाल्याचे सीसीकॅमेर्‍याच्या फुटेजवरून शेट्टी यांनी कळले होते. त्यावेळी त्यांनी म्हापसा पोलिसात तक्रार दिली होती.